वाळूजमहानगर, ता.31 – बोनस न देणाऱ्या कंत्राटदार व कारखान्यावर कारवाई करण्याच्या मागणीची दखल घेत वाळुज, शेंद्रा, पैठण येथील अनेक कंपन्या व कंत्राटदारांनी दखल घेतल्याने कॅज्युअल कामगारांना बारा ते पंधरा हजार रुपये बोनस मिळाला. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड झाल्याने कामगारांनी न्यू पॅंथर कामगार सेनेचे धन्यवाद व्यक्त करत त्यांचे स्वागत केले.
कायमस्वरूपी कामगारांबरोबरच कंत्राटी कामगारांना सुद्धा बोनस देण्यात यावा. तसेच बोनस न देणाऱ्या कंत्राटदार व कंपन्यांवर कारवाई करावी. अशी मागणी कामगार आयुक्तांकडे न्यू पॅंथर कामगार सेनेचे अध्यक्ष अनिल जाभाडे यांनी केली होती. कामगार आयुक्तांना दिलेल्या या निवेदनाची दखल घेत वाळूज, शेंद्रा, पैठण, चितेगाव, बिडकीन येथील अनेक कंत्राटदार व कंपन्यांनी कॅज्युअल कामगारांना बारा ते पंधरा हजार रुपये पर्यंत बोनस दिला. त्यामुळे कॅज्युअल कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. न्यू पॅंथर कामगार सेनेचे अध्यक्ष अनिल दाभाडे यांनी निवेदन दिल्यानेच कॅज्युअल कामगारांना भरघोस बोनस मिळू शकला. त्यामुळे विविध कंपन्यातील कॅज्युअल कामगारांनी बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात फटाक्याची आतिषबाजी करत न्यू पॅंथर कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाभाडे यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष किशोर साळवे, संजय सोनवणे, सुनील सोळंके, अमृता डोंगरदिवे, गणेश भुजबळ, अमजद शेख, नवनाथ नवले, योगेश नेमाने, दीपक बोबडे, हरी धांडे, गजानन पर्वत, सुनील परिस्कर, सच्चिदानंद गिरी, राजू उमाळे, राजू जाधव आदींसह कॅज्युअल कामगारांची मोठी उपस्थिती होती.