वाळूजमहानगर, (ता.28) – शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या कुंटणखाना सुरु असलेल्या हॉटेल सागरवर छापा टाकून दोन महिलांची सुटका करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुुड ईअर चौकातील हॉटेल सागर लॉजिंग येथे गुरूवारी (ता.27) रात्री 9 वाजेच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील गुडईअर चौकातील हॉटेल सागर लॉजिंग येथे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. त्या ग्राहकाने खात्री करून पोलिसांना इशारा करताच पोलीसांनी गुरूवारी (ता. 27) रात्री 9 वाजेच्या सुमारास पोलीसांनी छापा मारला. या छाप्यात वेश्या व्यवसाय करण्यासाठी पुणे येथून आणलेल्या दोन महिला आढळून आल्या. त्यांची सुटका करून पोलीसांनी हॉटेल मॅनेजर ओमकार राजेश पडळबघे उर्फ स्वामी रा. सावता माळी मंदिराजवळ व आकाश सोपान गागरे रा. दत्तनगर रांजणगाव (शेपु) यास अटक करून त्याच्यावर पिडित महिलांना त्यांचे इच्छेविरूध्द मनुष्य व्यापार करून वेश्याव्यवसायास प्रवृत केल्या प्रकरणी महिला पोलीस अंमलदार सुमन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. सोपान नरळे, पोह केशव काळे, चालक सुरेश काळवणे यांच्यासह महिला पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरिक्षक रामेश्वर गाडे करीत आहे.
