March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.28 – वाळूज येथील किड्स व्हॅली इंग्लिश स्कूल व सेमी इंग्लिश सरस्वती विद्या मंदिर वाळूज या शाळेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांनी होमी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवले आहे.

नोव्हेंबर मध्ये झालेल्या या परीक्षेत किड्स व्हॅली शाळेतील इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी स्वाती पुंडगे व झोया पटेल यांनी यश मिळवत आपल्या शाळेचं नाव लौकिक केलं आहे.

तर सरस्वती विद्यामंदिर मधील नववीतील विद्यार्थिनी भक्ती दळवी व शिवराज शिंदे यांनी यश मिळवत ही खडतर परीक्षा पास केली आहे.

या यशाबद्दल तिचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाकचौरे, मुख्याध्यापक व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्या वतीने कौतुक होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *