
वाळूजमहानगर, (ता.8) – ग्रोथ सेंटर, सिडको वाळूजमहानगर -1 येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. लहान मुलांचा बाल वर्ग व त्यावरील मोठ्या मुलांचा मोठा वर्ग अशा दोन गटात या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के उपस्थिती होती. या स्पर्धेत सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात हजर होते. बाल वर्गातील मुलांसाठी लिंबू चमचा, खेळणे जमा करणे, संगीत खुर्ची असे मजेदार खेळाचे अयोजन केले होते. तर वरील वर्गासाठी खो-खो, कब्बडी, बॅडमिंटन, हॉलीबॉल, बुद्धिबळ असे सांघिक खेळ घेण्यात आले. या सर्व खेळा मध्ये सर्व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत होता.

यावेळी कुणाल शिंदे, सोनाली कुलकर्णी, मधूश्री डाके, रुपाली उपळकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, सुवर्णा जोशी, वीणा कन्नवार, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, अर्चना जगताप, केतकी लिपणे, राणी कांबळे, सुवर्णा कदम, सरला रोडगे, सई राणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन कारण्यासाठी परिश्रम घेतले.
