February 5, 2026

वाळूजमहानगर (ता.26) :- सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये “पिंक डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती.

 

यावेळी सर्व विद्यार्थी गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर ड्रेस घालून आले होते. तसेच पिंक कलरचे फुगे, लहान लहान खेळणे घेऊन आले होते. यावेळी छान अशी सजावट करून कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचे नियोजन करून शाळेच्या पटांगणा मध्ये छान असे पिंक कलरच्या फुलाची प्रतिकृती तयार केली होती. यावेळी शिक्षिका सुवर्णा जोशी यांनी गुलाबी रंगा विषयी माहिती सांगितली. यावेळी सोनाली कुलकर्णी, मधूश्री डाके, रुपाली उपळकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, सुवर्णा जोशी, वीणा कन्नवार, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, मयुरी पवार, केतकी लिपणे, राणी कांबळे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *