वाळूजमहानगर (ता.15) : – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून बाल दिवस सोमवारी (ता.14) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संचालिका निर्मला म्हस्के होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या, तसेच भाषणातून बाल संस्कार कसे असावेत ते सांगितले. यावेळी काही विद्यार्थी चाचा नेहरूंच्या वेशभूषेत आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली कुलकर्णी, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, रूपाली उपळकर, राणी, केतकी लीपने, सरला रोडगे, सई राणे, सरिता डावखर, वंदना कदम, सुवर्णा जोशी, मधुश्री डाके, सुवर्णा कदम, मयुरी पवार, रूपाली चौधरी, विना कन्नावार यांनी परिश्रम घेतले.