March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.26) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थांनी वेग वेगवेगळे रंग उधळून होळी चा आनंद घेतला,

होळी चा सण हा आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. आणि हा उत्साह विद्यार्थांनी पुरेपूर अनुभवाला. मुलांना पर्यावरणाचे महत्व कळावे आणि भविष्यात त्यांनी ते अंमलात आणावे. यासाठी मुलांना सांगण्यात आले की कोरडी होळी खेळणे, पाण्याचा वापर कमी करणे, पाणाफुलापासून तयार केलेलेच रंग वापरणे, जसे की बीट ,हळद,मेहंदी, गुलाब पाकळ्या पासुंन रंग बनवणे.

विद्यार्थ्यांनीही नैसर्गिक रंग वापरून इको फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली. गाण्याच्या तालावर सर्व थिरकत होते. यावेळी शिक्षिका वीणा कन्नावार यांनी होळी सणाची माहिती मुलांना दिली.
यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रूपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, शितल चौधरी, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *