वाळूजमहानगर – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये नवरात्री निमित्ताने रास दांडिया कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, श्रद्धा म्हस्के उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांना नवरात्रीचे महत्त्व समजावे यासाठी शाळेच्या पटांगणामध्ये गोल रिंगण करून मोठ्या उत्साहात रास दांडिया खेळण्यात आला. कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींनी रंगबेरंगी असे घागरे आणि विद्यार्थ्यांनी कुर्ता पायजमा घालून गरबा नृत्य केले. शिक्षिकांनीही या दांडिया मध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी शिक्षिका सरला रोडगे, राणी कांबळे ,केतकी लीपने, मयुरी पवार, अर्चना जगताप, सरिता डावखर, विना कन्नावार ,वंदना कदम, मोनिका चतुर्भुज, रूपाली चौधरी ,सुवर्णा कदम ,रूपाली उपळकर, मधुश्री डाके ,सोनाली कुलकर्णी, सई राणे ,सुवर्णा जोशी यांनी परिश्रम घेतले.