
वाळूज महानगर, ता.2) – सर्वांच्या चित परिचित असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या वेशात किड्स केंब्रिज स्कूलचे विद्यार्थी आले. आणि त्यांनी शिक्षकांसमवेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. निमित्त होते जयंती आणि पुण्यतिथीचे.
अंकुर शिक्षण संस्था संचालित ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी शनिवारी (ता.1) रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका निर्मला म्हस्के तर प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी भाषण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्य आणि भारूड विषयी माहिती देण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या देश चळवळीची उदाहरणे देण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या वेषभूषेमध्ये बालवर्गातील शौर्य कुलकर्णी, स्वरांश शिंदे, कार्तिक पवार, प्रणय पाटील, आदित्य यशवंत, रुद्र पोफळघाट हे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिक्षिका सरिता डावखर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रूपाली उपळकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, वीणा कन्नावार, सुवर्णा कदम, भाग्यश्री मुळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी जाधव, राणी कांबळे, सई राणे, कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.
