March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – अंकुर शिक्षण संस्था संचालित ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के व मुख्यधपिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती.

लोकमान्य टिळक जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी भाषण दिले. यामधून लोकमान्य टिळक यांचे कर्तुत्व आणि देशप्रेम वक्त करण्यात आले. लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेमध्ये बाल वर्गातील विहान लोंढे आणि 2 री च्या वर्गातून प्रियांशु कांबळे हा विद्यार्थी उपस्थित होता. यावेळी शिक्षिका रुपाली उपळकर यांनी ही लोकमान्य यांच्या विषयी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती सांगितली. यावेळी सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली चौधरी, वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कन्नवार, मोनिका चतुर्भुज, भाग्यश्री मुळे, मयुरी पवार, सरिता डावखर, सुवर्णा कदम, सरला रोडगे, राणी कांबळे, सई राणे, कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *