
वाळूजमहानगर, (ता.5) – अंकुर शिक्षण संस्था संचलित ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती. 
गुरुपौर्णिमा निमित्त विद्यार्थ्यांची भाषणे झाली. मोठ्या वर्गातील विद्यार्थांनी नाटिका सादर केली, त्यातून त्यांनी आपल्या आयुष्यात गुरु चे किती महत्त्व दर्शविले. 10 वी च्या विद्यार्थिनींनी गुरु वंदना म्हणून नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले पुष्पगुच्छ व भेट कार्ड देऊन सर्व गुरूंचे स्वागत केले. 
यावेळी शिक्षिका सुवर्णा कदम यांनी गुरु विषयी महत्वपूर्ण माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, वीणा कन्नावार, शीतल चौधरी, सुवर्णा जोशी, भाग्यश्री मुळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरिता डावखर, सरला रोडगे, सई राणे, कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.
