March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.17) -सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाज्यांची ओळख व्हावी त्यातील फरक कळावा हा उद्देश ठेऊन या व्हेजिटेबल डे चे आयोजन शुक्रवारी (ता.17) रोजी करण्यात आले होते.


यावेळी निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, श्रद्धा म्हस्के उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाज्यांची ओळख करून व त्याचे गुणधर्म समजावून सांगितले. यावेळी लहान लहान मुलांनी स्टॉल मांडून भाजी आणि फळे खरेदी करून पैशांची देवाण घेवाण कशी करतात याचा अनुभव घेतला. यावेळी शिक्षिका मधुश्री डाके, सोनाली कुलकर्णी, रुपाली चौधरी, वंदना कदम, सुवर्णा जोशी, वीणा कन्नावार, सुवर्णा कदम, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *