March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये सायन्स डे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्व वर्गातील विद्यार्थांनी विज्ञान दिवस निमित्ताने वेगवेगळे विज्ञान प्रयोग तयार करून आणले होते. या सर्व प्रोजेक्ट्स मधून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि बुद्धी यांचे दर्शन झाले. यावेळी विद्यार्थी आपापल्या प्रोजेक्ट्सचे प्रात्यक्षिक ही करून दाखवत होते. विज्ञान विषयाच्या शिक्षिकांनी मुलांना विज्ञानाचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनाली कुलकर्णी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, वीणा कन्नावार, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *