
वाळूजमहानगर, (ता.1) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, निलेश म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व 10 वी च्या विद्यार्थांनी आपल्या शाळे बद्दलच्या भावना, अनुभव आणि आठवणींना उजाळा दिला. वर्ग नववी च्या विद्यार्थांनी 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी नाटिका आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रस्तुत केला. यावेळी प्रमुख उपस्थिती लाभलेले हिवाळे सर यांनी विद्यार्थांना परीक्षेबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. 10 वी च्या सर्व विद्यार्थांनी मिळून स्कूल साठी विद्येची देवी सरस्वती ची सुरेख मूर्ती भेट दिली. यावेळी सोनाली कुलकर्णी, रुपाली उपलकर, मधूश्री डाके, रुपाली चौधरी, वंदना कदम, सुवर्णा जोशी, वीणा कन्नावार, सुवर्णा कदम, सरिता डावखर, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, मयुरी पवार, सरला रोडगे, राणी कांबळे, कुणाल शिंदे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.
