
वाळूजमहानगर, (ता.21) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, श्रद्धा म्हस्के उपस्थित होत्या.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे स्वागत पुष्पांच्या वर्षावात संचालिका निर्मला म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांच्या प्रतिमाची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी शिवगर्जने सहित महाराज्यांचा जयजयकार करण्यात आला. त्याच बरोबर महाराज्यांची आरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी बालवर्गातील विद्यार्थी शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषे मध्ये उपस्थित होते.
विद्यार्थी यांनी महाराजांबद्दल भाषणे केली, 7 वी वर्गामधील विनय कासतोडे या विद्यार्थाने उस्फुर्त असा महाराजांचा पोवाडा सादर केला, वर्ग 8 वी तील भाग्यश्री आढाव हिने मर्दानी खेल सादर केला. शिक्षिका सुवर्णा जोशी यांनी महाराज यांच्या बद्दल महत्वाची महिती सांगितली. यावेळी शिक्षिका सरला रोडगे, राणी कांबळे, मयुरी पवार, अर्चना जगताप, सरिता डावखर, विना कन्नावार ,वंदना कदम, मोनिका चतुर्भुज, रूपाली चौधरी, सुवर्णा कदम, रूपाली उपळकर, मधुश्री डाके, सोनाली कुलकर्णी, सई राणे, कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.
