वाळूजमहानगर, ता.24- सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमधील चिमुकल्यांची ग्रोसरी शॉपला भेट देण्यात आली. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के आणि मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांनी हा ग्रोसरी शॉप विषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी बाल वर्गातील मुलांना किराणा दुकानात घेऊन जाण्यात आले. या लहान चिमुकल्यांना दुकानात कोणकोणत्या वस्तू असतात त्या कशा प्रकारे दिसतात आणि त्या वस्तू कशा प्रकारे खरेदी करायच्या याची माहिती मिळावी यासाठी त्यांना ग्रोसरी शॉप मध्ये नेण्यात आले होते. याप्रसंगी मुलांनी आवडीच्या वस्तू खरेदी करून आनंद. घेतला. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या वस्तू आपण दुकानातून कशा प्रकारे खरेदी करतो. हेपण या भेटीतून मुलांना कळाले. प्रत्येक आवडती वस्तू बघून मुलांना खूप आनंद झाला. आई बाबा याच्या सोबत तर ते दुकानात जातात, पण आपल्या वर्ग मित्रा सोबत ते पहिल्यांदाच दुकानात खरेदीसाठी गेले. प्रत्येक विद्यार्थीने वेगवेगळी खरेदी केली. यावेळी सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली उपळकर या शिक्षिका मुलांसोबत होत्या.