वाळूजमहानगर, (ता.29) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स कॅम्ब्रीज स्कूल मधील सर्व विद्यार्थी दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले. शाळेचा 100 टक्के निकाल लागण्याची परंपरा गेल्या 4 वर्षापासून सतत चालू असून याही वर्षी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
यामध्ये रेहवा कडू 89.80, प्राजक्ता कुलकर्णी 85.80, तन्मय गडगे 84.40, विद्या भडाईत 82.80, दीपिका राठोड 78.60, कार्तिक माने 77.80, कार्तिक इंगळे 75.80, वैष्णवी राऊत 73.40 हे विद्यार्थी गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष गोविंद गोंडे पाटील, संचालक निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांनी स्वागत करून कौतुक केले. यावेळी शाळेची शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांचा अभ्यास आणि शिक्षकांचे कष्ट खूप मोलाचे आहे. असे शाळेच्या संचालिका निर्मला म्हस्के म्हणाल्या.