
वाळूजमहानगर, (ता.28) – किड्स कॅम्ब्रीज स्कूल मध्ये विठ्ठल रुक्माई, विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषित पायी दिंडी काढण्यात येऊन आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. झालेल्या छोट्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंद गोंडे पाटील, संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती. 
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थी विठ्ठल रखुमाई व वारकरी यांच्या पोशाखात आले होते. यावेळी शाळेच्या प्रांगणात रिंगण करून हरिनामाचा गजर केला. वर्ग 4 थी व 8 वी च्या विद्यार्थांनी भारूड सादर केले. तर मोठ्या वर्गातील विद्यार्थिनींनी लेजीम सादर करत हरी नामाचा गाजर केला. सिडको महानगर-1 परिसरात दिंडी काढण्यात येऊन सारा इलाइट सोसायटी मधील मंदिरात सर्व मुलानी विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन केले. तेथे विविध कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात शिक्षिका सुवर्णा जोशी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी कशी व कशासाठी साजरी करावी. याचे महत्त्व सांगितले. 
यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, वीणा कन्नावार, सुवर्णा कदम, भाग्यश्री मुळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरिता डावखर, सई राणे, कुणाल शिंदे यांनी परिश्रम घेतले.
या दिंडीत विविध संतांच्या वेषभूषेमध्ये खालील विद्यार्थी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर- मयूर तांबे, संत निवृत्तीनाथ – सुशांत केकाने, संत मुक्ताबाई- नभा कदम, सोपान काका – आदित्य खेडकर, रुख्मिणी -सिद्धी व्यवहारे, देवश्री इंगोले, विठ्ठल – शौर्य कुलकर्णी व मीराबाई – स्वानंदी शेवाळे.
