March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.8) – अंकुर शिक्षण संस्था संचालित सिडको महानगर 1 येथील किड्स कॅम्ब्रिज स्कूल मध्ये “दही हंडी” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती. 

दहीहंडी निमित्त बाल वर्गातील चिमुकले कृष्ण आणि राधा बनून आले होते. शाळेच्या पटांगणात सुंदर सजावट केलेली दही हंडी लावण्यात आली होती. त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तीन थरांचा मनोरा रचून छोट्या बाळ गोपालाने दहीहंडी फोडली. आणि सर्वांचा एकच जल्लोष झाला. गाण्याच्या तालावर कृष्ण आणि राधाच्या वेशात आलेल्या विद्यार्थांनी थिरकले. यावेळी विद्यार्थी साक्षात कृष्ण आणि राधाचं जमिनीवर अवतरले आहेत असे वाटत होते. याप्रसंगी शिक्षिका सुवर्णा कदम यांनी विद्यार्थाना श्रीकृष्ण अष्टमी आणि गोपाळकाला या बद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमास शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी, वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कंन्नावर, भाग्यश्री मुळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरिता डावखर, राणी कांबळे, सरला रोडगे, सई राणे, कुणाल शिंदे यांचे सहकार्य लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *