
वाळूज महानगर, ता.1 बातमीदार) – अंकुर शिक्षण संस्था संचालित सिडको महानगर 1 येथील किड्स कॅम्ब्रिज स्कूल मध्ये रक्षा बंधन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनी राखी घेऊन आणि सर्व विद्यार्थी मुलींसाठी भेट वस्तू घेऊन आले होते. मुलींनी राखी बांधून औक्षण केले. त्यांना मिठाई खाऊ घालून रक्षा बंधनाचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा म्हणजे स्कूल च्या वतीने निसर्गाला संबोधित करून झाडाला बांधली जाणारी राखी. ही एक राखी इको फ्रेंडली असते, यावर्षी तांदुळापासून कमळाच्या आकाराची तयार करण्यात आलेली राखी आणि सध्याच्या घडामोडीवर आधारित राखी तसेच चंद्रयान थीम ची सुंदर अशी राखी तयार करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या हस्ते या राखी वृक्षाला बांधण्यात आल्या आणि निसर्गाचे रक्षण आपण करू तरच निसर्ग आपले रक्षण करेल, असा सामाजिक संदेश देत रक्षा बंधन सण मोठ्या जल्लोष्यात साजरा झाला. 
यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली उपलकर, वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कंन्नावर, सुवर्णा कदम, भाग्यश्री मुळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार, सरिता डावखर, राणी कांबळे, सई राणे, कुणाल शिंदे यांचे सहकार्य लाभले.
