February 5, 2026


वाळूजमहानगर, ता.8) – भरधाव जाणारी कार व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील 2 जण जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवर जिकठाण फाटा येथे शुक्रवारी (ता.8) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, भिकचंद रामराव झळके वय 55 वर्ष आणि मुलगी गायत्री झळके वय 18 वर्ष रा. जिकठाण हे शुक्रवारी (ता.8) रोजी दुचाकी (एम एच 20 ई टी – 5132) ने लिंबेजळगाव वरून जिकठाणला जात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जिकठाण फाट्याजवळ स्विफ्ट कार


(एम एच 20, सी एच – 9988) ने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात गायत्री झळके ही गंभीर जखमी झाली. तर भिकचंद झळके यांना किरकोळ मार लागला.

अपघाताची माहिती मिळताच जवळच असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची 24 तास सेवेत असणारी विनामूल्य अंबुलन्स त्वरित अपघात ग्रस्त ठिकाणी हजर होऊन अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *