वाळूजमहानगर, ता.9 – एका मागे एक भरधाव जाणाऱ्या कार आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापूर धुळे रोडवरील ए एस क्लब उड्डाण पुलावर 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कातराबाद ता. जि. छ.संभाजीनगर येथील संतोष इंदल नायमाने (वय 36) व त्याची पत्नी कल्पना संतोष नायमाने (वय 30) असे दोघे 4 जानेवारी 2025 रोजी हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच 20, बी डब्ल्यू -7628)ने पचमरेवाडीवरुन कातराबाद येथे येत असतांना ए एस क्लबजवळील उड्डाण पुलावर (सोलापुर ते धुळे हायवे रोड) चढत असतांना त्यांच्या दुचाकी समोर टाटा कार (एमएच 20, जीव्ही-9767) च्या चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे अपघात होऊन नायमाने पतीपत्नी गंभीर जखमी झाले. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर कार चालक अपघातस्थळी न थांबता पळुन गेला आहे. कल्पना नायमाने यांच्या फिर्यादीवरून कार चालकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.