March 22, 2026

वाळुज महानगर, (ता.25) – भरधाव जाणारी कार आणि दुचाकी यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर जालना हायवेवरील गाडेजळगाव फाटा येथे झाला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरकडून जालनाकडे जाणाऱ्या दुचाकी (एम एच 27, डी डी-9352) व त्यामागून भरधाव जाणारी कार (एम एच 20, डी व्ही- 9293) यांच्यात जोराची धडक दिली.

छत्रपती संभाजीनगर जालना हायवे वरील गाडेजळगाव फाटा येथे शिवराज हॉटेल समोर गुरुवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी 12:27 वाजता झालेल्या या अपघातात आदित्य नितीन बोरे (वय 22) वर्ष रा. ता. जि. अमरावती हा जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच करमाड येथे उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य रामानंदाचार्य संस्थान नानिजधाम 24 तास विनामूल्य सेवा देणारी अंबुलन्सचे चालक बाळू कातकडे यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमीला करमाड घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *