वाळूजमहानगर, ता.3 – शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे आणि संघर्ष करतच पक्षात सामान्य कार्यकर्ते मोठंमोठे नेते घडले. कार्यकर्ता हा संघटनेचा पाया आहे आणि आपला पाया भक्कम आहे. त्याच जोरावर येणाऱ्या काळात पश्चिममध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा स्वाभिमानाने फडकेल. असा विश्वास उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर यांनी अध्यक्षीय भाषण करताना बजाजनगर वडगाव (को.) रविवारी (ता. 2) रोजी व्यक्त केला.
बजाजनगर वडगाव (को.) मध्ये राजकीय समिकरणे बदलत असताना पक्ष संघटना बळकटीकरनासाठी रविवारी (ता. 2) रोजी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख अरविंद धिवर होते. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलभैया चोरडिया, तालुका संघटक बाळासाहेब कार्ले, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव यांनी मार्गदर्शन करून उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपले अनुभव सांगत येणाऱ्या काळात पूर्ण ताकदीने पक्ष कार्य करावे. अशी भावना व्यक्त केली. बैठकीचे सूत्रसंचालन व संयोजन उपतालुकाप्रमुख विशाल खंडागळे यांनी केले. यावेळी उपतालुकाप्रमुख लक्ष्मण लांडे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, सुदाम भंडे, श्रीकृष्ण राठोड, ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौधरी, महिला आघाडी तालुका संघटिका अनिता पाटील, शहर प्रमुख संगीता बनकर, उपशहरप्रमुख दत्तात्रय वरपे, बजरंग पाटील, काकाजी जीवरग, विभागप्रमुख रतन नलावडे, विनोद सोनवणे, संतोष चंदन, संजय मुरादे, शिवशंकर सगट, रोहिदास चव्हाण,लहू खराटे, अक्षय खरात, आकाश पवार, गजानन गुणाले, दत्ता कावरखे, पंढरीनाथ चोपडे, धोंडिबा वरवते, सचिन रोकडे, राजू चव्हाण, दीपक चव्हाण, संजय सोनवणे, अशोक कटारे, शंकर दांडगे, सुनील गोरे, दादाराव गोराडे, यशवंत चौधरी, अनिल जाधव, बाळासाहेब शिंदे, मीरा ताई चव्हाण, जोत्स्ना सोनवणे, अनिता लेंडे आदींची उपस्थिती होती.
पक्षाच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद –
विधानसभा निवडणुकीनंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघात मोठी राजकिय समीकरणे बदलली. अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. तर काहींनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. यासर्व घडामोडीत प्रामुख्याने बजाजनगर – वडगाव (को)च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामान्य कार्यकर्ता मात्र पक्षात एकसंध टिकून राहिला. असे चित्र यावेळी दिसून आले.