
वाळूज महानगर, (ता.27) – आदर्श गांव पाटोदाला कार्बन न्युट्रल विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामविकास (पंचायतराज) विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी गावाने राबविलेल्या उपक्रमाची पाहणी केली. तसेच परत अभियानात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. 
यावेळी त्यांच्या बरोबर सहाय्यक कक्ष अधिकारी प्रकाश शेंडगे, प्रकाश विशे यांचीही उपस्थिती होती. सरपंच जयश्री किशोर दिवेकर, उपसरपंच कपिंद्र कैलास पेरे, ग्रामविकास अधिकारी पी एस पाटील, ग्रा.पं.सदस्य पुष्पा सोमीनाथ पेरे, लक्ष्मण मातकर, मीरा जाधव, छाया पवार, शामल थटवले, सुनिता पेरे, बेबीबाई पेरे, मंदा खोकड, पूनम गाडेकर व शिवाजी जाधव, दुर्गेश खोकड, जि.प.प्रा.शाळा पाटोदाचे मुख्याध्यक, व शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी व गांवकरी उपस्थित होते.
