
वाळूज महानगर – कार्तिकी एकादशीनिमित्त वाळूज परिसरातील छोटे पंढरपूर परिसरातील भाविकांची अलोट गर्दी झाल्याने दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान विठू नामाचा गजर करत दिवसभरातून हजारो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने विठ्ठल रुक्माई चे रविवारी 2 नोव्हेंबर रोजी दर्शन घेतले.

वाळुज परिसरातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या पंढरपुरात आषाढी कार्तिकी निमित्त मोठी यात्रा भरते. रविवारी दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादस असल्याने वाळूज परिसरात जिल्ह्यात तिला अनेक ठिकाणाहून डाळ मृदंगाच्या गजर करत अनेक लहान मोठ्या दिंड्या दाखल झाल्या.
कार्तिकी एकादशी निमित्त भरणाऱ्या यात्रेत लहान मुलांची खेळणी संसार उपयोगी साहित्य तसेच मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक साहित्य, प्रसाद, खाद्यपदार्थ आणि पूजेच्या वस्तूंच्या दुकानांची गजबज दिसून आली.
प्रथम पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचा महाभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आल दुपारी कीर्तन मंडपात गाथा भजन पार पडले़ विशेष म्हणजे मध्यरात्रीपासूनच पंचक्रोशितील दिंडया दाखल होत होत्या़ दुपारी स्वामी शिवगिरी महाराजांच्या श्री शिवपुराण कथा झाली. त्यानंतर दुपारी सुरमणी पंडित गिरीश गोसावी यांचे विविध संतांच्या रचनांवर आधारित शास्त्रीय संगीत अभंगवाणी हा कार्यक्रम झाला़ यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी लाभ घेतला़ कार्यक्रमासाठी प्रा़ गजानन केचे, रुद्र केचे, गोसावी, विनोद केनेकर, गणेश आव्हाड, बंडू औताडे आणि आनंद कुलकर्णी यांनी साथ दिली. कार्तिकी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले़. यात्रेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके यांच्यासह मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. मंदिर समितीने दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, व सुरक्षेची व्यवस्था केली होती. यावेळी सहायक पोलीस आयुक्त भागीरथी पवार, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनी सुषमा पवार, सपोनि अरविंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, बाळासाहेब आंधळे, निलेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला
