March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.14) – वाळूज सब डिव्हिजनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल गायकवाड यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने बुधवारी (ता.14) रोजी निवेदन देऊन बजाजनगर परिसरातील वीज वितरण व देखभाल संदर्भात असलेल्या विविध नागरी समस्या तात्काळ सोडवा. अन्यथा कार्यलयाला कुलूप लावू. असा इशारा शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने देण्यात आला.


शहरप्रमुख विशाल खंडागळे, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, पावसाळ्या अगोदर झाडे कटिंगची कामे करणे, वीज बिल दरवाढ कमी करणे, सेवा उत्तम कशी करता येईल, त्यासाठी प्रयत्न करणे, रात्रपाळीला लाईट गेल्यावर कार्यालयीन लॅण्ड लाईन नंबर चालू ठेवणे, कर्मचारी संख्या वाढवणे, जे नागरिक ऑनलाइन वीज बिल भरणा करतात त्यांना वीज बिलात सवलत देणे, ज्या नागरिकांचे वीज बिल प्रकरण चालू आहे. त्यासाठी तडजोड करून सर्व प्रकरण निकाली काढणे, डी पी संरक्षक भिंत बांधणे आदी मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. यावेळी विभागप्रमुख काकाजी जीवरग, संतोष चंदन, रोहिदास चव्हाण, विनोद दाभाडे, विनोद सोनवणे, उपविभागप्रमुख अशोक कटारे, दौलत दाभाडे, कर्मचारी भागवत गव्हाणे, शरद पाचोडे, शैलेश लोखंडे आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *