
वाळूजमहानगर, (ता.3) – बजाजनगर येथील सामाजिक विचार मंच तर्फे 1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार पुतळ्याची साफसफाई करून बुधवारी (ता.1) रोजी अभिवादन करण्यात आले.
यावेळी जय महाराष्ट्र आणि कामगार एकजुटीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. याप्रसंगी मंचचे अध्यक्ष केशव ढोले व सचिव रविंद्र शेलगावकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमास अमर निकम, शिवाजी राऊत, विश्वनाथ धोंडगे, बी जी पाटील, ऋषीकेश पाटील, सुरेश वंजारी, विनोद वडोदकर, रघुनाथ पेहलवान, सावता अवघडे, माणिक कुंभार, व्यंकटी टेकाडे, मारूती हिंगणे, मेनिनाथ खरबडे, गणेश पळसकर, ज्ञानेश्वर धुर्वे, वाल्मिक धोक्रट, संजय फलटणे आदींची उपस्थिती होती.
