
वाळूजमहानगर, (ता.2) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण भवन बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर येथे 63 व्या महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिना निमित्त मेटलमन ऑटो लिमिटेडचे एच. आर. हेड विजय साळवे यांच्या हस्ते सोमवारी (ता.1) रोजी ध्वजारोहण करण्यात आले.
सहायक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी अशोक गावंडे, पी एस गुजर, रतन पाटील, लक्ष्मण पाटील, विनोद भाग्यवंत, बालाजी पांचाळ, नितीन निंभोरकर यांच्यासह बजाजनगर परिसरातील कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते. कामगार कल्याण भवन बजाजनगर येथील केंद्र येथील कल्याण निरीक्षक विजय अहिरे यांच्यासह उपसंचालिका ज्ञानेश्वरी ताले, ग्रंथपाल नीलिमा गावंडे, शिशुमंदिर शिक्षिका संगीता पवार व सुषमा रेखाते तसेच सीता पोहीवाले, वनिता मसने, प्रकाश जंगले, अशोक राठोड, बाळकृष्ण कुदळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
