March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.15) – वाळुज औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करणाऱ्या कामगाराची मुलगी नागपूर येथे नुकत्याच झालेल्या ज्युदो स्पर्धेत राज्यातून प्रथम आली आहे.


नागपूर येथे 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या व महाराष्ट्र ज्युदो संघटनेने आयोजित केलेल्या 50 व्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत रिया निलेश पाटील हिने ज्युदो खेळाचे थरारक प्रदर्शन करत गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. वाळुज औद्योगिक वसाहतीतील मेटल मॅन ऑटो या कंपनीचे निलेश पाटील यांची रिया पाटील ही मुलगी आहे. कामगार असलेल्या आई-वडिलांचे रियाला मिळणाऱ्या प्रोत्सनामुळे आणि ज्युदो क्लबच्या अथक परिश्रमामुळे रिया पाटील हीने महाराष्ट्र राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. या विजयाबद्दल तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. रिया पाटील ही बजाजनगर सराव करत असून ती लिटिल एंजल्स शाळेत दहावी मध्ये शिक्षण घेत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *