वाळूजमहानगर, ता.12 – राहत असलेल्या कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये लॉक करून ठेवलेली वीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या या चोरी प्रकरणी दहा डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अतुल शालिकराम भंडारी, (वय 30) रा.धानोली ता. सालेकसा जि. गोंदिया (ह.मु. देवद्वारका कॉम्पलॅक्स, फ्लॅट नं-2 श्रीराम प्लाझा वडगाव कोल्हाटी ता.जि. छत्रपती संभाजीनगर)हे वाळुज परिसरात खाजगी नोकरी करतात. त्यांच्या मालकीची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 35, ए डी -8969) ही राहत असलेल्या कॉम्प्लेक्स च्या पार्किंग मध्ये हंड्रेड लॉक करून ठेवली होती. ती अज्ञात चोरट्यांनी 23 नोव्हेंबर रोजी लंपास केली. यात दुचाकीचा भंडारी यांनी परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध 10 डिसेंबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
