February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.12) – जोगेश्वरी येथील एका कामगाराने वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या पार्कीग मध्ये उभी केलेली दुचाकी 31 नोव्हेंबर रोजी लंपास केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

जोगेश्वरी येथील रावसाहेब भालेराव यांनी 31 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 20, ईएम -4401) कंपनीच्या पार्कीग मध्ये हॅन्ड लॉक करून उभी केली होती. काम आटपुन पुन्हा घरी जाण्यासाठी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास निघले असता, उभ्या केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही. तिचा आजू बाजूला शोध घेतला असता मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध मंगळवारी (ता.12) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *