
वाळुज महानगर – कंपनीत काम करणाऱ्या एका 25 वर्षीय सुपरवायझरचा अचानक मृत्यू झाला. मात्र शवविच्छेदनानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त करत मृतदेह स्विकारण्यास नकार देत कंपनीत पोहोचले. परिस्थिती तणावपूर्ण होण्यापूर्वीच वाळूज पोलिसांनी धाव घेत त्यांना समजावून सांगितल्याने प्रकरण निवळले. ही घटना गुरुवारी 18 डिसेंबर रोजी रोजी वाळुजजवळील लिंबे जळगाव टोलनाक्याजवळ कंपनीसमोर घडली.
बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज गावाजवळील अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या टेक्नोमॅट स्प्रिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत स्वप्नील पंडित राठोड (24) हा सुपरवायझर म्हणून काम करत होता. बुधवारी 18 डिसेंबर रोजी अचानक तो कामाच्या ठिकाणी बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात व त्यानंतर घाटी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
नातेवाईक कंपनी प्रवेशद्वारावर
स्वप्निल राठोड यांच्या मृत्यू बाबत शंका वर्तवत नातेवाईकांनी गुरुवारी रोजी दुपारी कंपनी प्रवेशद्वारावर पोहोचले. त्यांनी कंपनी मालकांशी बोलून स्वप्नीलच्या नैसर्गिक मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली. दरम्यान कंपनी प्रवेशद्वारावर तणाव निर्माण होऊ नये म्हणून वाळूज कंपनीसमोर पहारा देऊन कंपनी मालक आणि स्वप्नीलचे नातेवाईक यांची पोलिस ठाण्यात बैठक घेतली. पोलिसांनी तपासाची माहिती दिली आणि निष्पक्ष कारवाईचे आश्वासन दिले. तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूबद्दल कुटुंबाचे दुःख समजून कंपनी मालकांनी सरकारी नियमांनुसार आर्थिक भरपाई देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे वाढता तणाव कमी झाला. स्वप्नीलचे कुटुंबीय घाटीत आले, त्यांनी शवविच्छेदन केले आणि स्वप्नीलचा मृतदेह ताब्यात घेतला.
नियमाप्रमाणे आर्थिक लाभ देण्यात येईल –
स्वप्नील गेल्या नऊ महिन्यांपासून आमच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. आमच्या कंपनीला त्याच्या अचानक निधनाने दुःख झाले आहे. स्वप्नीलच्या कुटुंबाला ईएसआय आणि सरकारी नियमांनुसार आर्थिक लाभ देण्यात येतील. असे टेक्नो मॅट स्प्रिंग प्रा. लि.कंपनी मालक अजय गांधी म्हणाले.
निष्पक्ष चौकशी केली जाईल –
स्वप्नीलचा मृत्यू कोणत्याही अपघातामुळे झाला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हे उघड झाले आहे. स्वप्नीलचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण पूर्णपणे स्पष्ट होईल. पोलिस निष्पक्ष कारवाई करतील. असे वाळूज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यावेळी म्हणाले.
