March 23, 2026

वाळूज महानगर (ता.8) – कंपनीतून सुट्टी झाल्यानंतर बाहेर जाऊन दुसऱ्या मार्गाने कंपनीत प्रवेश करून 3 लाख रुपये किमतीचे प्रत्येकी 40 किलो वजनाचे ब्रास मटेरियलचे 5 कॉईल लंपास केल्याप्रकरणी एका कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरीची घटना 28 ऑक्टोबर रोजी रात्री वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं ए -188/189 मध्ये अश्विन प्रेसिंग कॉम्पोनन्ट्स नावाची कंपनी आहे. 28 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी 7 वाजता कंपनी सुटल्यानंतर या कंपनीत काम करणारा आरोपी कामगार कृष्णा गंगाधर गोरे बाहेर निघाला. व परत दुसऱ्या मार्गाने कंपनीमध्ये येवुन पाण्याच्या टाकीवर जावुन लपुन बसला. सर्व कामगार गेल्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास तो खाली उतरला. त्या नंतर त्याने 3 लाख रुपये किमतीचे प्रतेकी 40 किलो वजनाचे ब्रास मटेरियलचे 5 कॉईल कंपनीच्या गेटवरुन खाली टाकल्या. व एका पांढऱ्या रंगाच्या कार मधून घेवुन गेला. ही चोरीची घटना 29 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस येतात कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले असता, त्यात चोरीचा हा सर्व प्रकार चित्रित झालेला दिसला. याप्रकरणी कंपनी मॅनेजर राकेश उत्तमराव साळुंके यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *