March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.11) : – कानिफनाथाच्या दर्शनाला निघालेले चार जण टोका (कायगाव) येथील श्री सिद्देश्वर महादेव मंदिराजवळील गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पालखेड ता.वैजापूर येथील चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (ता.11) रोजी दुपारी 4 विजेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पालखेड ता.वैजापूर येथील आकाश भागीनाथ गोरे वय 20 वर्ष, शंकर परसनाथ घोडके वय 25 वर्ष, बाबासाहेब अशोक गोरे वय 31 वर्ष व नागेश दिलीप गोरे वय 19 वर्ष असे चार जण
शनिवारी (ता.11) रोजी दुचाकीवर मढी येथील कानिफनाथाच्या दर्शनास चालले होते. रस्त्यातील टोका (कायगाव) येथील प्राचीन शिवमंदिर असलेले श्री सिद्देश्वर महादेव मंदिर लगतच्या घाटावरील गोदावरी नदीत पोहण्यासाठी उतरले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील दोन जण बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी दुसरे दोघेही पाण्यात उतरले. मात्र दुर्दैवाने चारही जण पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच नेवासा आणि गंगापूर येथील पोलीस पथक, कायगावचे जीवरक्षक दल व छत्रपती संभाजीनगरचे अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्यतीचे प्रयत्न करून चारही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे वैजापूर तालुक्यासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *