वाळुज महानगर, (ता 14) :- सारा हार्मोनी कांचनवाडी येथे भारतीय राजज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित भव्य नेत्र तपासणी शिबिर, अभिवादन व डॉ संकपाळ एम डी यांचे बाबासाहेब व जनसामान्याचे जीवन व त्यांचे आरोग्य याविषयावर प्रबोधन हे कार्यक्रम शुक्रवारी 14 एप्रिल रोजी घेण्यात आले.
यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावर बोलताना डॉ संकपाळ म्हणाले की, जे बाबासाहेबांना विसरले त्यांचे सुखी जीवन रुळावरुन घसरले, कारण की जे बाबासाहेबांना जमले ते इतर कोणालाही जमले नाही. महिलानाही त्यांनी असा संदेश दिला की, मुलामुलीना शिकवा व त्यांच्यावर चांगले संस्कार करा. फक्त जयन्तिमधे नाचनारे नको त्यांचे पुस्तके वाचनारे हवेत. यावेळी डॉ योगेश बादले व त्यांचे सहकारी यानी मोफत नेत्र तपासणी करून उपचार व सल्ला दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष मगर, सचिव धनवे व सर्व पदाधिकारी तसेच महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले .धनंजय शिंदे यांनी आभार मानले.
