*गंगापूर तालुक्यातील शिवराई ग्रामपंचायतचा उपक्रम*

वाळूज महानगर, ता.5) – अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये थेट आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तात्काळ माफ करून त्यांना कर्जमुक्त करावे. यासह विविध मागण्यांचा ठराव वाळुज जवळील शिवराई ग्रामपंचायतच्या वतीने रविवारी 5 ऑक्टोबर रोजी पारित करण्यात आला.

शिवसेना नेते अंबादास दानवे 11 ऑक्टोंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा निमित्त रविवारी 5 ऑक्टोंबर रोजी वाळूज जवळील शिवराई येथे ग्रामसभा घेण्यात आली.
सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत यासह पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा. असे ठराव प्रारित करण्यात आले.

याप्रसंगी सहायक कृषी अधिकारी सरोजिनी चव्हाण, मंडळ अधिकारीसचिन भिंगारे, तलाठी उदय कुलकर्णी, महसूल सेवक अमोल खैरनार, सरपंच नितीन भुजंग, उपसरपंच तुषार कुंजर, ग्रामसेवक एस. के. राठोड,
उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, गंगापूर पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, गंगापूर तालुका उपाध्यक्ष मनोज पिंपळे, वाळुज सर्कल प्रमुख बाळासाहेब चनघटे, वाळुज शहर प्रमुख बाबासाहेब आरगडे, उपशहर प्रमुख संजय शिंदे,
शिवराई शाखाप्रमुख नाथा शेळके, पिंपरखेडा शाखाप्रमुख राजू शेख, उपशाखाप्रमुख बद्रीनाथ चनघटे, वाळुज उपशहर प्रमुख विश्वनाथ थोरात, वाळुज उपविभाग प्रमुख देवेंद्र चव्हाण, सुभाष जाधव, युवासेना वाळूज शहर प्रमुख सौरभ वैद्य, महेश पवार, संतोष जमधडे, अमोल हांडे, दादा पाटील कुंजर, विष्णू नवपुते व गजेंद्र कुंजर आदी उपस्थित होते.
