वाळूजमहानगर, (ता.13) – सद्याच्या काळात महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेता, इप्का फाऊंडेशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) आणि गेब्स फाउंडेशन औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग पूर्व तपासणी व कर्करोग जनजागृती शिबिराचे भव्य आयोजन 14 डिसेंबर 2022 बुधवारी करण्यात आले आहे
बजाजनगर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर, त्रिमूर्ती चौक येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या या शिबिरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय औरंगाबाद तर्फे डॉ. संजय राठोड, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अर्चना राठोड, डॉ. ऋषिकेश खाडिलकर या तज्ज्ञ डॉक्टरांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे. या मोफत तपासणी शिबिराचा व मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आव्हान इप्का फाऊंडेशन तर्फे डॉ. व्यंकट मैलापूरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय आणि गेब्स फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
