February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.14) – वाळूज परिसरातील करोडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पद निवडणूक अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या वेळेत सोमीनाथ राधाकिसन नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे नवले यांची
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी आर रामशेटवाड यांनी शुक्रवारी (ता.13) रोजी जाहीर केले.

करोडी ग्रामपंचायतच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती सर्जेराव पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वधर्मसमभाव ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागेवर विजय मिळवला होता. तर सरपंच पदासाठी जनतेतून झालेल्या निवडणुकीत त्यांच्याच पॅनलच्या सुनिता देविदास गवंदे या विजयी झाल्या होत्या. निवडणुकीनंतर शुक्रवारी (ता.13) रोजी उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच सुनीताताई देविदास गवंदे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक अधिकारी बी.आर.रामशेठवाड, तलाठी पी.एन.बिरारे, ग्रामविकास अधिकारी एस डी साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी निवडणूक प्रक्रियेच्या वेळेत सोमीनाथ राधाकिसन नवले यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी दाखल झाला. त्यामुळे निवडणूक अधिकारी बी आर रामशेठवाड यांनी सोमीनाथ नवले यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष पॅनलप्रमुख सर्जेराव पाटील चव्हाण, पंचायत समिती सदस्य विजय जाधव, यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी जल्लोष केला.

 

यावेळी पॅनल प्रमुख सर्जेराव चव्हाण यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच सुनिताताई गवांदे, उपसरपंच सोमीनाथ नवले, ग्रामपंचायत सदस्य दगडू चव्हाण, सोनाली दवंदे, योगेश्वरी जाधव,मनीषा जाधव, सिंधुबाई गडगूळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.

यावेळी सुरेश गडगूळ, सूर्यभान जाधव, रामूकाका जाधव, कारभारी महाराज, साहेबराव जाधव, नामदेव नवले, ज्ञानेश्वर जीते, मनोहर चव्हाण, विलास जाधव, शेषराव जाधव, सोपान जाधव, मुरलीधर जाधव, प्रकाश गडगूळ, जनार्दन दवंडे, कैलास जाधव,कडूबाळ गडगूळ, दिगंबर गडगूळ, संतोष गडगूळ, संदीप जाधव, राजू राजपूत, समाधान जाधव, संजय गवंदे यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची यावेळी उपस्थिती होती.

सलग तिसऱ्यांदा वर्चस्व –
करोडी ग्रामपंचायतवर पॅनल प्रमुख सर्जेराव चव्हाण यांचे कायम वर्चस्व राहिलेले आहे. 2012 पासून चव्हाण यांचेच ग्रामपंचायत मध्ये बहुमत आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचा पाया मजबूत असल्याचे दिसून येते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *