वाळूजमहानगर – भगवान महावीर स्कूल बजाजनगर येथे माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी कोविडनंतर अभ्यासाबाबत येणाऱ्या समस्या यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओएमजी नॅशनल बुक रेकॉर्ड विजेत्या, करिअर गुरू नंदिनी भावसार यांनी मुलांना आपल्या ओघवत्या शैलीमध्ये उत्तम मार्गदर्शन केले.
शाळेतील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना मोबाईलचे तोटे, एकाग्रता, अभ्यासाचे व वेळेचे नियोजन यशस्वी होण्यासाठी छोट्या छोट्या टिप अगदी हसत खेळत सांगितल्या. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्या शंका विचारून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रत्नमाला येवलेकर यांनी केले तर आभार करुणा चोपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी सांगोले व विशाल कामळे यांनी परिश्रम घेतले.