वाळूजमहानगर (ता.26) :- ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरीची ग्रामसभा मौजे कमळापूर येथील जिल्हा परिषद शाळे समोरील पटांगणात शुक्रवारी (ता.25) रोजी झाली. ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच गजानन बोंबले व सचिव पदी ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील धनवई हे होते. ग्रामसभेत नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या प्रथम ग्रामसभेत मागील सभेचा वृत्तांत वाचून ग्रामसभा सुरू करण्यात आली.
ग्रामसभेमध्ये सण 23-24 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक वाचण्यात आले. तसेच ग्रामसभेत 15 वा वित्त आयोग, पुढील आर्थिक वर्षाचे नियोजनाचा आराखडा. या विषयी चर्चा करण्यात आली. तसेच ऐनवेळी येणारे विषयांमध्ये ड्रेनेज रस्ते दुरुस्ती व नागरिकांचे अर्ज अर्ज घेऊन समस्या सोडविण्यात आले. तसेच ज्या समस्या व विकास कामं राहिले असेल ते लवकरच सोडवु असे आश्वासन सरपंच गजानन बोंबले यांनी यावेळी दिले. या ग्रामसभेला माजी सरपंच अमोल लोहकरे, ग्रामपंचायत सदस्य शेख मोईन, नजीरखाँ पठाण, उपसरपंच प्रवीण दुबिले, योगेश दळवी, गणेश ठोकळ, किशोर बिलवाल, सुरेश वाघमारे, अनिल वाघ, गणेश साबळे, रमेश आरगडे, प्रवीण थोरात, पंडित पनाड, विलास सौदागर, कृष्णा काजळे, प्रभाकर सूर्यभान काजळे, तसेच ग्रामस्थ हमीदुल्ला शेख, शफुल्ला शेख, रफीकखा पठाण, तोफिक पठाण, जमील शेख, अहमद सय्यद, अरुण पठारे, सरदार शेख व ग्रामपंचायत कर्मचारी अशपाक बेग, मनोहर लोहकरे आदी उपस्थित होते.