March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.6) – राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका 54 वर्षीय इसमाने आत्महत्या केली. ही घटना कमळापूर येथील दशरथनगर येथे शुक्रवारी (ता.5) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धर्मेंद्र गणेशराव चोंढेकर वय 54 वर्षे रा. दशरथनगर, कमळापुर ता. गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर याने शुक्रवारी ( ता. 5) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याने तो बेशुद्ध झाला. ही घटना उघडकीस येताच त्याला आकाश खतीले यांनी उपचारार्थ घाटी रुग्णालय येथे अपघात विभागात आणुन दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन 11.15 वाजता मयत घोषित केले. धर्मेंद्र चौंढेकर यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र ते अद्यापही स्पष्ट नाही. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीचे पोलीस हवालदार एस डी सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश मनोरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *