March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – पती-पत्नी कामाला कंपनीत गेल्यानंतर घरी लहान भावासोबत असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फोन करून काहीतरी आमिष दाखवून तिचे अपहरण केले. वाळूज परिसरातील कमळापूर येथे गुरुवारी (ता.25) रोजी दुपारी ही घटना घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज परिसरातील कमलापूर येथे राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडील दोघेही कंपनीत काम करतात. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. गुरुवारी (ता.25) रोजी सकाळी दोघेही कंपनीत कामाला गेल्यानंतर 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी लहान भावासोबत घरीच होती. तिला दुपारी 1 वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी काहीतरी आम्ही दाखवून फोन करून बोलावून घेतले. आणि तिचे अपहरण केले. ही माहिती मिळताच तिचे आई-वडील कंपनीतून घरी आले. आणि तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. याप्रकरणी अपहत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण झालेल्या मुलीचे वर्णन असे-
वय 15 वर्ष, शिक्षण-10 वी, रा. वाळुज परिसरातील कमळापूर, रंग- गोरा, उंची- 5 फुट, चेहरा- लांबट, डोळे- काळे, बांधा- मजबुत, केस – काळे, नाक- सरळ, अंगात- टॉप व लँगौज, पायात – सँडल.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *