March 26, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – आपापसात नातेवाईक असलेल्या कंपनी मालकाच्या मध्यस्थीने दिलेले 5 लाख रुपये वसूल करण्यासाठी गैर कायद्याची मंडळी जमा करून कंपनीत घुसून तोडफोड करत दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (ता.13) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली. या प्रकारामुळे वाळूज परिसरातील उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा आला आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंब र सी- 246 मधील रँपिड टुलींग शॉपचा मालक सचिन महादेव जायभाये वय- 32 वर्ष रा.साई रेसीडेंसी, वडगाव (कोल्हाटी) – बजाजनगर, ता.जि. छत्रपती संभाजीनगर, याच्या मध्यस्थीने डॉ. भास्कर जायभाये यांनी सचिन जायभाये याचा मावसभाऊ ओमकार डोळे यांस दोन वर्षापुर्वी 5 लाख रुपये दिले होते. त्याची धर म्हणून डोळे याने जायभाय याला चेक (धनादेश) दिला आहे.

गुरुवारी (ता.13) रोजी अंदाजे रात्री 10.30 वाजेच्या सुमारास सचिन हा त्याच्या रॅपिड टूलींगचे शॉप सी-247, एमआयडीसी वाळूज येथे असताना डॉ. भास्कर जायभाये याचा मुलगा आरोपी आर्यन भास्कर जायभाये, सुभाष बडे, बाबुराव बडे व त्यांच्या सोबत असलेला एक अनोळखी इसम असे 4 जण सचिन याच्या शाँप मध्ये आले. त्यातील आर्यन जायभाये हा म्हणाला की, ओमकार डोळे याला तुझ्या मध्यस्थीने दिलेले 5 लाख रुपये मला दे, तेव्हा सचिनने ओमकार डोळे याने दिलेला चेक (धनादेश) बँके मध्ये टाकण्यास सांगितले. तेव्हा तुझ्याकडे बघून ओमकार याला पैसे दिलेले आहे, तु मला पैसे दे. असे म्हणून आर्यन जायभायेने शिवीगाळ करत जायभाय व त्याच्यासोबतच्या लोकांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.

 

तसेच सचिन जायभाये यांच्या शाँप मध्ये असलेले प्रिंटर, कुलर, हाईट गेज याची तोडफोड करून नुकसान करून तेथून पळून गेले. यात सचिन याच्या डाव्या हातावर, उजव्या हाताच्या दंडावर, पाठीवर डाव्या बाजुला गंभीर दुखापत झाली. तसेच सचिन याच्या शाँप मध्ये काम करणारा संदिप बोराडे यास देखील त्यांनी रोडवर मारहाण केली. याप्रकरणी सचिन महादेव जायभाये याच्या फिर्यादीवरून आरोपी आर्यन भास्कर जायभाये, सुभाष बडे, बाबुराव बडे व त्यांचे अन्य अनोळखी साथीदारांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 324, 427, 323, 504, 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        औद्योगिक वसाहतीत अराजकता –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील गुंडागर्दी तसेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत. त्यामुळे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असून खंडणीसारखे प्रकार समोर येत आहे. येथील वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्योजकांनी येथे राहावे की, नाही असा प्रश्न या प्रकरणातील फिर्यादी सचिन जायभाये यांनी उपस्थित केला आहे.

आरोपी सीसीटीव्हीत –
दरम्यान या मारहाणीचे चित्रण कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात आले असून आरोपी 4 पेक्षा जास्त असून ते मारहाण करीत असल्याचे दिसत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *