वाळूजमहानगर, (ता.7) – भरधाव जाणारा कंटेनर व दुचाकी यांच्यात अपघात झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.7) रोजी भल्या पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास पैठण लिंक रोड दरम्यान खामनदी पुलाजवळ झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथील क्रांतीनगरात राहणारा राहुल हरिश्चंद्र भिसे (वय 40) हा वाळूजजवळील रांजणगाव (उरूसाचे) येथून दुचाकी (एमएच 20,डीयु -2507) वरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होता. ए एस क्लब चौक पास केल्यानंतर तो पैठण लिंक रोडने निघाला. दरम्यान त्याच्या पाठोपाठ कंटेनेर (सीजी 04, पीडी -4270) येत होता. ही दोन्ही वाहने खामनदी ओलाडुन पाटीलवाडा हॉटेल जवळ येताच त्यांच्याच अपघात झाला.
शुक्रवारी (ता.7) पहाटे 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार राहून भिसे हा गंभीर जखमी झाला. त्यास जमखी अवस्थेत पोलीसांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले असता, त्याचा मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाताप्रकरणी घाटीतून आलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामचंद्र बिघोत करीत आहे.