वाळूज महानगर – रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.14) रोजी सकाळी मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता.11) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्याजवळ झाला होता.
वाळूज येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणारी जाकेराबी कासम शेख (वय 61) ही वृद्ध महिला मंगळवारी (ता.11) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास लायननगर येथे नातवंडाना भेटण्यासाठी जात होती. वाळूज पोलिस ठाण्याजवळून औरंगाबाद पुणे महामार्ग ओलांडत असतांना औरंगाबादकडून पुण्याकडे भरधाव जाणार्या कंटेनर (एच आर 55, ए जे -8002) च्या चालकाने जाकेराबी शेख या महिलेला जोराचीे धडक दिली. वाळूज पोलीस ठाण्यासमोरच झालेल्या या अपघातानंतर नागरिकांनी धाव घेत तिला उपचारार्थ घाटीत दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान जाकेराबी कासम शेख हीचा शुक्रवारी (ता.14) रोजी सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.