मराठवाडा कन्नड संघा वतीने औरंगाबाद येथे भव्य कन्नड भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भात रविवारी (ता.16) रोजी मराठवाडा कन्नड संघाच्या शिष्टमंडळाने भारत सरकारचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
केशप्पा होंनाली, किरण कुलकर्णी, गुरू चिंचोली, श्रीनिवास तेलंग, मोहोमध नदाफ, साई रेड्डी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी हे निवेदन स्वीकारून कन्नड भवनाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. येत्या काही दिवसांत होणाऱ्या सोहळ्यात अधिकाधिक लोक सहभागी झाले आहे. आणि येत्या काही दिवसांत सरकारचे सहकार्यही मिळेल. अशी अपेक्षा मराठवाडा कन्नड संघाच्या वतीने व्यक्त केली आहे. अशी माहिती मराठवाडा कन्नड संघाचे श्रीनी तेलंग यांनी दिली.