वाळूजमहानगर, (ता.17) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई ) फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या वार्षिक परीक्षेत बीजीपीएस संचलित औरंगाबाद पब्लिक स्कूलने घवघवीत यश मिळविले.
औरंगाबाद पब्लिक स्कूल ही वाळूज औद्योगिक परिसरात एक नामांकित शाळा आहे. शाळेने आपली परंपरा कायम राखत यशाचे एक नवीन शिखर गाठले आहे. शाळेतील गुणवतांनी अतिशय चांगल्या गुणांनी यश संपादन केले आहे. त्यामध्ये प्रथमेश कणके 97.2, यश जाधव 96.6, आदिती गडाख 91.5, तुषार चांदा 87.4, प्रथमेश आडे 87, गौरव राठोड 86.7, पुनम सावंत 86, तनिष्का देसले 84.8, आदित्य कोलते 84.2 प्रतिक चव्हाण 82.8 या अनुक्रमे दहा मुलांनी 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादित केले आहे. शाळेसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सहसचिव अमन जाधव व शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला शर्मा यांनी कौतुक केले.