March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.5) – सोहम दगडू मोगल इयत्ता 6 वी (एपीस) याने अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (एआयएसएईई) 2023 मध्ये पात्रता मिळवली आणि एकूण 300 गुणांपैकी 232 गुण पटकावले. औरंगाबाद पब्लिक स्कूलची यशाची परंपरा कायम राखली.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एन टी ए) द्वारे 8 जानेवारी 2023 रोजी देशभरातील 180 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. 33 सैनिक शाळा आणि 18 नवीन मान्यताप्राप्त सैनिक शाळांमध्ये इयत्ता-6 वी आणि इयत्ता 9 वी च्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. यात सोहम मोगल याने यश संपादन केले. बीजीपीएसचे सहसचिव अमन जाधव आणि औरंगाबाद पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका चंद्रकला शर्मा यांनी विद्यार्थी मोगल व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. यावेळी सोहमचे वडील दगडू मोगल हे म्हणाले की, आमच्यासाठी व औरंगाबाद पब्लिक स्कूलसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. त्यांचा असा विश्वास आहे की, सोहम हा औरंगाबाद पब्लिक स्कूलचा एक विद्वान विद्यार्थी (एपीएसियन) आहे. ज्याने तेथे धडे घेतले आणि नामांकित अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2023 यामध्ये पात्र ठरला. सोहम हा अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2023 मध्ये पात्र ठरल्याने त्यास वेदव्यास सैनिक स्कूल, केरळ, भारत येथे प्रवेश मिळाला. औरंगाबाद पब्लिक स्कूल मुलाची आणि त्यांच्या पालकांची पहिली पसंती ठरली. ते पुढे म्हणाले, “ए पी एस ही एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. जी विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी एक शिडी आहे.”

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *