वाळुज महानगर – औरंगाबाद सिटी कराटे डो असोसिएशन व औरंगाबाद जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सबज्युनिअर कराटे स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता.16) ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात आलेले आहे.
तिरूमला मंगल कार्यालय, पुंडलिकनगर येथे होणाऱ्या या स्पर्धेतून कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे 5 ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सबज्युनिअर कराटे स्पर्धेकरिता औरंगाबाद शहर व जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. स्पर्धा या सबजुनिअर 6 ते 14 वर्षापर्यंत मुले व मुली,अश्या कुमिते व काता अश्या प्रकारात विविध वजन गट वयोगटात होणार आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेचा पुराव्यासह 15 ऑक्टोबर पर्यंत मुकेश बनकर यांच्याकडे नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव, सचिव बळीराम राठोड, शहर संघटनेचे अध्यक्ष अरुण भोसले, सचिव मुकेश बनकर यांनी केले आहे.